अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- भरधाव वेगाने जात असलेल्या सॅन्ट्रो कारने दिलेल्या धडकेत एकजनाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना केडगाव जवळ सोनेवाडी रोडवर एमएसइबी ऑफिसच्या समोर घडली. याबाबत सॅन्ट्रो कार चालक भाऊसाहेब दगडू गारुडकर (रा. अकोळनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या अपघातात संजय महादेव बोडखे रा. केडगाव यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनेवाडी रोडवरील एमएसइबी ऑफिसजवळ रस्त्याच्या बाजूला मोटरसायकल उभी करून बोडखे हे लघुशंका करण्यासाठी गेले होते.
दरम्यान त्यांचे सहकारी वैभव जाधव व गणेश ठोंबरे हे दोघे मोटरसायकल जवळ थांबले होते. यावेळी केडगाववरुन सोनेवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या सॅन्ट्रो कारने (एमएच१२सीके२५७६) गरूडकर यांना जोरदार धडक दिली.
यात ते जबर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यात (एमएच १६ बीएक्स ५३६०) या मोटरसायकलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सॅन्ट्रो चालक गारुडकर याच्यावर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.