अहमदनगर शहरातील 23 मशिदीमध्ये एक वेळच्या आजानची परवानगी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉक डाउन काळात शहरातील सर्व मशिदी बंद आहेत.

मात्र रमजान काळात राज्यांसाठी सवलत देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती.

त्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलाने शहरातील 23 मशिदी मध्ये उपवास सोडण्यासाठी फक्त (मगरिब)

संध्याकाळची आजानला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एक वेळच्या आजानची परवानगी देण्यात आली आहे.

या बाबत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके,

कोतवाली चे पोलीस निरीक्षक विकास वाघ, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरून मुलानी

यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाचे हाजी मन्सूर शेख,

हाजी करीम हुंडेकरी, उबेद शेख, हाजी शौकत सर उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24