अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- सासऱ्याकडून हातऊसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी जात असलेल्या एकास आम्ही तुम्हाला तुमच्या पाहुण्याच्या घरी सोडतो. असे सांगत त्याला मोटारसायकलवर बसवुन त्याचे अपहण करून मारहाण करत ९० हजार रुपयांचा ऐवज लुटला.
तब्बल आठ दिवसानंतर त्याच्या गावी सोडण्यात आले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत तरुणाच्या फिर्यादीसार एकुण चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी भागवत ज्ञानोबा चौधारी वय ३५ रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड यांनी आपल्या सासर्याकडुन ५० हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसै देण्यासाठी ते वाघीरा या गावी चालले होते.
दरम्यान याच वेळी फिर्यादीच्या नागोबाचीवाडी या गावातील बळीराम सिताराम गोपाळघरे, तुकाराम सिताराम गोपाळघरे, सिताराम निवृत्ती गोपाळघरे तिघे रा. नागोबाचीवाडी व शत्रुघ्न मधुकर सानप रा. सौताडा या चौघे फिर्यादीस म्हणाले की, आम्ही पण सौताडा येथे मुकादमाकडे चाललो आहोत.
आपण बरोबरच जाऊ व पुढे जाऊन वाघीरा येथे तुमच्या सासर्याचे पैसै देऊन येऊ, असे म्हणून फिर्यादीस त्यांच्या मोटारसायकलवर बसवुन सानप याच्या सौताडा येथील घरी जाण्यासाठी निघाले. हे सर्वजण बीड रोडवरील साकत फाटा येथे आले असता आरोपींनी फिर्यादीकडील ५० हजार रुपये व एक तोळ्याची अंगठी व मोबाइल असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.
यानंतर पुढे दि.२७ नोव्हेंबर २०१९ ते १ जानेवारी २०१९ पर्यंत सौताडा येथील आरोपीच्या घरी डांबुन ठेवले तसेच पुढे दि.२ जानेवारी २०१९ रोजी पिकअप गाडीत बसवून भुईंज कारखाना येथे नेहुन डांबुन ठेऊन पुन्हा मारहाण केली.
यानंतर दि ५ डिसेंबर २०१९ रोजी फीर्यादीस तब्बल आठ दिवसांनी त्याच्या घरी आणुन सोडले तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या नंतर फिर्यादी भागवत ज्ञानोबा चौधारी यांनी जामखेड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर हे करीत आहेत.