ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : गुटखा दिला नाही, याचा राग मनात धरत एकाचा खून !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अरणगाव शिवारात (ता. नगर) किरकोळ कारणावरून एका कामगाराचा त्याचाच सहकाऱ्याकडून खून करण्यात आला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली. अजय रामरूम चौधरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हा तरुण सध्या अरणगाव येथे राहत होता. तो मूळचा मटियार (ता. भुतहवा, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) येथील मूळचा रहिवासी होता.या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात शैलेंद्र सुरेश यादव यांनी फिर्याद दाखल केली.

फिर्यादीनुसार आरोपी तेजनारायण अर्जुन ताते (हल्ली रा. अरणगाव, मुळचा बिहार ) याच्याविरुद्ध भादविकच्या ३०२ प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

किरकोळ कारणावरून मयत अजय व आरोपी तेजनारायण यांच्यात शिवीगाळ झाली. अजय याने तेजनारायण याला गुटखा दिला नाही, याचा राग मनात धरत तेजनारायण याने अजय यास लाकडी काठीने मारहाण केली.

त्या मारहाणीत अजय चौधरी यांच्या डोक्याला गंभीर जखम होवून ते मृत्यूमुखी पावले.फिर्यादी व साक्षीदार भांडण सोडविण्यासाठी गेले होते.मयत अजय व आरोपी तेजनारायण हे दोघे जी. एच.व्ही. या कंपनीत कामगार म्हणून काम करत होते.

ही कंपनी सध्या बायपास रस्त्याचे काम करत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस उपविभागीय अधिकारी संपत भोसले, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोसई रणजीत मारग,पोसई युवराज चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office