नवी दिल्ली :- स्वयंपाकघरात गृहिणींना कांद्याने रडवले असून त्यांच्या घरखर्चामध्ये महागलेल्या कांद्यामुळे डोळ्यात पाणी आणले आहे. तसेच आता रात्रपाळी करणारे अगदी सुरक्षा रक्षक असोत किंवा अन्य कामांमधील कामगार असोत, त्यांना मोबाईल हे वेळ घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन झाले होते, आता त्या मोबाईल फोनचा वापर कमी करण्यासाठी यांना झगडावे लागणार आहे.
कारण, त्यांना मिळणारी डेटा सुविधा आता स्वस्त राहिलेली नाही. या स्थितीमुळे आता अनेक मोबाईल ग्राहक हे बेसिक प्लॅनमध्ये परत जात आहेत. भविष्य, बॉलीवूड्स क्रिकेट, भक्ती आदींसाठी स्मार्टफोनचा जो वापर होत होता, त्यात घट होऊ लागली आहे.
बेसिक प्लॅनमध्ये केवळ इनकमिंग मिळते व आपल्या घरापासून दूर राहून काम करणारेे अनेक जण कुटुंबाशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करीत होते, त्यांचे प्रमाण आता प्रचंड कमी होऊ लागले आहे. इंटरनेट वापर करणे अनेक लोकांना आता महाग झालेल्या कांद्यापेक्षाही त्रासदायक ठरू लागले आहे.
आतापर्यंत स्वस्त प्लॅनमुळे लागलेली सवय आता अनेक बाबतीत त्यांना जाचक ठरू लागली आहे. घरकाम करणाऱ्या एका महिलेने सांगितले की, जेव्हा तिने मोबाईल वापरणे सुरू केलेस तेव्हा मोबाईलसाठी ५० रुपये मासिक खर्च ती करू लागली होती.
मात्र आता हा खर्च ९८ रुपये झाला आहे. तो अधिक वाटत आहे. गरीब वर्गातील लोकांना त्यामुळे हा मोबाईल वापरणे आता खिशाबाहेर जाणारे ठरत आहे.घरकाम करणाऱ्या या महिलेप्रमाणे वॉचमन व अन्य प्रकारची रात्रीची कामे करणाऱ्यांना मोबाईल व इंटरनेट वापर अतिशय गरजेचा भाग झाला; परंतु आता तो खिशाबाहेर असलेला खर्च ठरू लागला आहे.
एकवेळ कांदा नसला तरी महिला त्याविना जेवण तयार करून जेवू घालत होत्या, लोक जेवण करीत होते; पण डेटा महागल्याने ही वेगळीच मानसिक ताणाची बाब त्रासदायक ठरू लागणार आहे.व्हिडीओ पाहाणे आता महाग पडत आहे.
त्यामुळे त्याचा वापर करणे एक तर आवरते घ्यावे लागणार आहे किंवा बंद करावे लागणार आहे. ज्यांचे वेतन मुळात १० हजार रुपयांपर्यंत असते त्यांना आता डेटा महागल्याने काटकसर करावी लागणार आहे.