कांद्याला ‘ह्या’ ठिकाणी मिळाला उच्चांकी भाव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- देशभरात असलेल्या कोरोनाच्या संकाटामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.

यात भर म्हणून कांद्याबाबत मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. काही कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव समाधानकारक नव्हते. परंतु आता कांद्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा उपआवार घोडेगाव येथे बुधवारी झालेल्या कांदा लिलावात १९ हजार कांदा गोणीची आवक झाली होती.

याठिकाणी प्रति क्विंटल २ हजार ३३५ रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. याठिकाणी  कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त २ हजार ३३५ रुपयांपर्यंत भाव मिळाला.

श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा बाजार मध्ये बुधवारी ९ हजार ८१६ कांदा गोण्यांची आवक झाली. उत्तम प्रतीच्या कांद्याला २ हजार ४००  रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.

दरम्यान, नुकतेच शेतकरी कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. आता अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकरी आणखीनच कोलमडला.

थोडा फार कांद्याचा आधार मिळेल अशी अपेक्षा असणारा शेतकरीवर्ग भाव कोसळल्याने आणि काही कांदा सडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यास साहाय्य करावे असे माजी आ. कोल्हे यांनी मागणी केली होती.

 असे मिळाले भाव –

उत्तम प्रतीचा कांदा-  १ हजार ९००  ते २ हजार ४०० रुपये, दोन नंबर कांदा-१०००  ते १८५०  रुपये, तीन नंबर कांदा- १०० ते ९५० रुपये ,  गोल्टी कांदा – १२००  ते १८००  रुपये.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24