बाजारात कांदा १०० रुपये किलो !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे : पावसामुळे नव्या कांद्याचे झालेले नुकसान तसेच साठवणुकीतील जुना कांदा संपत आल्याने घाऊक बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर ८० ते ९० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर, किरकोळ बाजारात कांदा १०० रुपये किलो भावाने विकला जात आहे.

सामान्यांना कांदा खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले आहे. तसेच नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून, घाऊक बाजारात नवीन कांद्यास प्रति किलोस ३० ते ६५ रुपये भाव मिळत आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात रविवारी जुन्या कांद्याची ४० ट्रक तर नव्या कांद्याची ४० ट्रक इतकी आवक झाली.

यंदा परतीचा पाऊस लांबल्याने त्याचा फटका कांद्याच्या नव्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बसला. जुना आणि चांगल्या दर्जाचा कांदा केवळ महाराष्ट्रातच उपलब्ध आहे.

त्यामुळे त्यास कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेतील राज्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24