कांदा व्यापार्‍याचा शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा; भीतीचे वातावरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  राज्यात कांदा उत्पादनासाठी राहुरी तालुका प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील वांबोरी येथील कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. अनेकांचा विश्वास संपादन केल्याने शेतकरी या व्यापार्‍याला डोळे झाकून कांदा उधारीवर देत होते.

यामुळे आपले कांद्याचे पैसे बुडतात कि काय या कारणाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कांदा उत्पादनासाठी वांबोरी (ता. राहुरी) येथील एक सुप्रसिद्ध कांदा व्यापार्‍याने अनेक शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयाचा गंडा घालून पसार झाल्याची चर्चा आहे.

यामुळे वांबोरीत कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी ‘त्या’ पसार व्यापार्‍याच्या घरी गर्दी करण्यास सुरूवात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ऐन करोना संकटात शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वांबोरी गावाच्या मध्यवस्तीमध्ये राहत असणारा

हा तरुण कांदा व्यापारी दहा वर्षांपासून शिवार मापनुसार कांदा खरेदीचा व्यवसाय करत आहे. हा व्यापारी नेहमीच चढ्या भावाने कांदा खरेदी करत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी या व्यापार्‍याला कांदा देत होते. यामुळे या व्यापार्‍याने जिल्ह्यात चांगला जम बसविला होता.

दांडगा संपर्क व अनेकांचा विश्वास संपादन केल्याने शेतकरी या व्यापार्‍याला डोळे झाकून कांदा उधारीवर देत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून या व्यापार्‍याचे अंदाजे दहा कोटी रुपयांचे कांदा खरेदीचे पैसे थकीत असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये आहे.

संबंधित व्यापार्‍याने राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कांदे खरेदी केले आहेत. आता हे सर्व व्यापारी वांबोरीतील त्याच्या घरी गेले असता त्याचे घर बंद आढळून आले आहे.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24