राहुरी :- अवघ्या दोन दिवसांत कांद्याच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी घट झाली. रविवारी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबर गावरान कांद्याला १६०० ते २००० रुपये क्विंटल भाव मिळाला.
शुक्रवारी १९०० ते २४०० रुपयांप्रमाणे विक्री झाली होती. रविवारी ३२ हजार ९९ गोण्यांची आवक झाली. दोन नंबर कांद्याला १००० ते १५९०, तीन नंबरला २०० ते ९९५, तर गोल्टी कांद्याला ५०० ते १८०० रुपये भाव मिळाला.