शेवगाव | अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीवरच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची वेळ शेवगाव पोलिसांवर आली.
मुळचे एरंडगाव येथे राहणाऱ्या मनोज विष्णू नजन (सध्या श्रीकृष्णनगर शेवगाव, वय ३१) याचा
१२ रोजी रात्री शहरातील साई आनंद एजन्सीसमोर बुलेट या वाहनावरून पडून अपघाती मृत्यू झाला.
पोलिस त्या ठिकाणी गेले. त्यांनी मनोज यास ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला .
दरम्यान, मनोजचा अपघाती पंचनामा करताना त्याच्याजवळ एक गावठी कट्टा व एक चाकू आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी मृत मनोजविरुद्ध गुन्हा दाखल केला.