महापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  स्थायी समितीच्या निवडणुकीआधी भाजपच्या कोट्यातून स्थायी समितीवर गेलेले नगरसेवक मनोज कोतकर यांनी गळ्यातील भाजपचा पंचा काढून टाकून घड्याळाचा पंचा परिधान केला व सभापतीपदाची उमेदवारी राष्ट्रवादीकडून दाखल केली.

त्यानंतर ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगून सेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले व त्यांची बिनविरोध निवड केली गेली.

त्यानंतर भाजपच्या महापौरांनी कोतकर भाजपचेच असल्याचा दावा केल्याने गाडे यांनी, मनपा राजकारणात भाजप व राष्ट्रवादीची मैत्री कायम असून,

सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीची फसवणूक झाल्याचा दावा करून सेनेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मिडियातूनही भावना व्यक्त केल्या आहेत.

यात त्यांनी म्हटले आहे की, नेमकं कोण खरं बोलतंय? महापौर की आमदार? या दोघांपैकी एकजण नक्कीच खोटं बोलतंय, हे मात्र नक्की… सभापती कोतकर नेमके राष्ट्रवादीचे की भाजपाचे?

जनतेची फसवणूक नगरच्या स्थायी समितीसाठी झाली आहे. नगरकरांना महापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा,

अशी मागणीही त्यांनी केली आहे.सभापती निवडीवरून झालेल्या राजकारणाने सेनेतील अस्वस्थता वाढीस लागल्याचे दिसू लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24