अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- अनिवासी भारतीय उद्योगपती बीआर शेट्टी यांच्या मालकीची कंपनी फिनाब्लर एक डॉलरला विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलच्या प्रिझम ग्रुप एजीला विकण्यात येणार आहे.
कर्जाच्या ओझ्यामुळे ही कंपनी विकण्याची वेळ बीआर शेट्टी यांच्यावर आली आहे. जगभरातील 170 देशांमध्ये पसरलेली फिनाब्लर कंपनी ही 45 देशांमध्ये प्रत्यक्ष काम करते. गेल्या वर्षीपर्यंत कंपनीचे बाजारमूल्य 2 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 14 हजार 704 कोटी रुपये इतकं होतं.
कंपनीच्या खरेदीसाठी प्रिझमने अबुधाबीच्या रॉयल स्ट्रेटेजिक पार्टनर्ससोबत करार केला आहे. बीआर शेट्टी यांच्या फायनेंशियल सर्विस कंपनी फिनाब्लरने घोषणा केली आहे की, ग्लोबल फिनटेक इन्वेस्टमेंट्स होल्डिंग सोबत ते करार करत आहेत. GFIH इस्राईलच्या प्रिज्म ग्रुप ची सहकारी कंपनी आहे.
ज्यांना Finablr Plc लिमिटेड संपूर्ण संपत्ती विकत आहे. इस्राईलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांच्याशी संबंधित असलेल्या प्रिज्म ग्रुपने या बाबत व्यवहार करण्यासाठी अबुधाबीच्या रॉयल स्ट्रेटेजिक पार्टनर्स सोबत एक कमिटी स्थापन केली आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये फिनाब्लरची मार्केट वॅल्यू $ 2 बिलियन इतकी होती.
एप्रिलमध्ये त्यांच्यावर $1 बिलियनपेक्षा अधिकचं कर्ज होतं. एप्रिल महिन्यात फिनाब्लरने बोर्डाने लपवलेल्या जवळपास एक बिलियन डॉलरच्या कर्जाची माहिती समोर आली. एनएमसीने त्यांच्या हिशोबात फेरफार केल्याचं लंडन स्टॉक एक्सचेंजने म्हटलं होतं. या घोटाळ्याने फिनाब्लर आणि एनएमसी हेल्थ पीएलसीला मोठा दणका बसला.
पीएलसी ही दुबईत आरोग्य सुविधा पुरवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. दुबईमध्ये बीआर शेट्टी यांच्या खासगी मालमत्तांमध्ये जगातील सर्वात उंच अशा बुर्ज खलिफामध्ये दोन मजले आहेत. तसंच पॉम जुमेरियामध्ये एक व्हिला आहे.1970 मध्ये ते फक्त 8 डॉलर घेऊन दुबईला पोहचले होते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला सुरुवात केली होती.
बीआर शेट्टी यांनी 1980 मध्ये अमीरातमध्ये सर्वात जुनी रेमिटेंस बिझनेस यूएई एक्सचेंजची सुरुवात केली. यूएई एक्सचेंज, यूकेची एक्सचेंज कंपनी ट्रॅवलेक्स सह छोट्या-छोट्या पेमेंट सोल्यूशंस प्रोवाईडर्स आणि शेट्टींची फिनब्लर सोबत 2018 मध्ये सार्वजनिक झाली होती.
शेट्टी यांनी हेल्थकेयर आणि फायनॅनशल सर्विसेजसह हॉस्पिटेलिटी, फूड अँड बेवरेज, फार्मास्यूटिकल मॅन्युफॅक्चरिंग तसेच रिअल इस्टेटमध्ये देखील त्यांनी व्यवसाय केला.