अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजना म्हूणन जिल्ह्यातील काही तालुके हे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
नुकताच राहुरी तालुक्यात 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यानंतर राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशनने राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत जनता कर्फ्यू पाळण्यास विरोध दर्शविण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन देण्यात आले. राहुरीतही तहसीलदारांना निवेदन देऊन बंदला विरोध करण्यात आला.
त्यामुळे राहुरी तालुका लॉकडाऊन होणार का, याकडे लक्ष लागले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, कोरोना लॉकडाऊन काळात वारंवार आमचे व्यवसाय बंद होते.
व्यवसाय बंद असल्यामुळे आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ज्यावेळी राहुरी फॅक्टरी येथे कोरोना पेशंट निघाले तेव्हा श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशनने स्वयं घोषीत लॉकडाऊन ठेवले होते.
आता प्रशासनाने पुन्हा आठ दिवसांचा राहुरी तालुका लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमध्ये आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेवू शकत नाही, असेही संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक, रिक्षावाले, भाजीपाला, फळ विक्रेते व इतर व्यावसायिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे कोरोना महामारीला सोबत घेऊन जगायला शिकावे लागेल.
अन्यथा गरीब जनता भूकबळी ठरेल. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आले आहे. निवेदनावर सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाबासाहेब साठे, अनिल जाधव,
नबी शेख, बॉबी साळवे, कल्याण जगधने, देवदान गायकवाड, अरुण पवार, मोहम्मद ईराणी, मकबूल इनामदार, सचिन साळवे, गणेश पवार, बाबासाहेब मकासरे, पिंटू साळवे, संदीप गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved