आमचा मराठा आरक्षणास संपूर्ण पाठिंबा – मधुकर पिचड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-खासदार संभाजी महाराज यांनी सूचवल्यानुसार गरज पडल्यास लाल महाल ते लाल किल्ला अशी लढाई करून आरक्षण मिळवावेच लागेल.

आमचा मराठा आरक्षणास संपूर्ण पाठिंबा आहे, अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी दिली. शनिवारी अकोल्यात आयोजित मराठा आरक्षण क्रांती मोर्चात जाहीर पाठींबा व्यक्त करताना पिचड बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि. प. अध्यक्ष अशोक भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, निवृत्ती महाराज इंदोरीकर, मधुकर नवले,

भाजपचे शिवाजी धुमाळ, वसंत मनकर, भाकपचे कारभारी उगले, किसान सभेचे डाॅ. अजित नवले, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे,

सुरेश नवले, अशोक आरोटे, बी. जे. देशमुख, संभाजी दहातोंडे, अरुण रूपवते, काँग्रेसचे बाळासाहेब नाईकवाडी, गिरजाजी जाधव, जालिंदर वाकचौरे, मारूती मेंगाळ, विनय सावंत, मनसेचे अनिल झोळेकर,

बाळासाहेब भोर, विकास शेटे उपस्थित होते. मोर्चाची सुरूवात महात्मा फुले चौकातून झाली. घोषणा देत प्रमुख मार्गावरून बाजारतळावर मोर्चा आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

नगराध्यक्ष संगीता शेटे व भाजप महिला सेलच्या जिल्हाध्यक्ष रेश्मा गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. शिवशाहीर मुकुंद भोर यांनी पोवाडा सादर केला. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24