अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एके ठिकाणी भाडोत्री खोलीत राहणाऱ्या इयत्ता अकरावीतील १८ वयाच्या विद्यार्थिनीवर आरोपी अजिमोद्दीन अमीनशहा शेख, (वय ७१) रा. आखेगाव रोड, शेवगाव याने तीन-चार वेळा शरीरसंबंध करून बळजबरीने बलात्कार केला.
फिर्यादीत पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे कि, आई- वडिलांसह भाड्याच्या घरात रहात असताना आरोपी अजिमोद्दीन अमीनशहा शेख हा शेवगाव येथून नमाजकामी पाथर्डी तालुक्यात येवून
त्याने विद्यार्थिनींशी घरात एकटी असल्याचे पाहून तिला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने तीन-चार वेळा बलात्कार करुन तु जरकोणाला काही सांगितले तर जिवे ठार मारील.
अशी धमकी दिली, आई-वडिलांना सांगून ही फिर्याद पिडीत मुलीने दिली. पाथर्डी पोलिसांनी आरोपी म्हातारा अजमोद्दीन अमीनशहा शेख या नराधमास ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून काल याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.