अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहता: शेती, सहकार, शिक्षण, पाणी या क्षेत्रातील अभ्यासक पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा तृतीय स्मृतीदिना निमित्त प्रवरा परिवाराच्या वतीने सोमवार दि. ३० डिसेंबर २०१९ राजी सकाळी ९ वा. प्रवरानगर येथील स्मृतीस्थळावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रवरा परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वरसुमनांजली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास माजी गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील,
प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.वाय.एम जयराज, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, सभापती हिराबाई कातोरे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, डॉ.तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हा.चेअरमन शामराव निमसे, प्रतापराव जगताप, कैलासराव तांबे यांसह प्रवरा उद्योग समुहातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या संपुर्ण राजकीय, सामाजिक वाटचालीत ग्रामीण भागाच्या विकासाचा मंत्र दिला. उपेक्षित घटकांसाठी त्यांनी न्यायाची भुमिका बजावुन या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
जिरायती भागाच्या पाणी प्रश्नाचा सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. पश्चिम वाहीनी नद्यांचे वाहुन जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात वळविण्यासाठी त्यांनी मांडलेली भुमिका राज्याने स्विकारुन त्याचे धोरणात रुपांतर केले.
लोकनेते पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याची आठवण या स्मृतीदिनाच्या निमित्ताने दरवर्षी अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने होते.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने विविध शाखांमध्ये अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपन तसेच लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवरानगर येथे आयोजित केलेल्या या अभिवादन आणि स्वरसुमनांजली कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवरा परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.