नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर – नगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ आज पहाटेच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून मृतांमधील सर्वच व्यक्ती हे धुळ्याचे रहिवाशी होते.

ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय ३०), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-२०), इरफान शयशोदोहा अन्सारी असे मृतांची नावे आहेत, तर अदनान निहाल अन्सारी (वय-२१) गंभीर जखमी आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओने नगरकडे येत होते.

दरम्यान स्कॉर्पिओने जातेगावफाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला MH 22 AA 524 वर पाठिमागून आलेल्या स्कार्पिओ नंबर MH 18 AJ 8443 या गाडीने जोराची धडक दिली.

पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरल नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले व एक जखमी झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24