पारनेर :- तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली.
आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. गुणोरे, ता. पारनेर) ही मयतांची नावे आहेत.
यातील एक मुलगा दिव्यांग असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. बडे कुटुंबीयांच्या मृत्यू मागे नेमके काय कारण आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रात्री नेहमीप्रमाणे बडे कुटुंबीय जेवण करून झोपले होते. आज सकाळी शेजारी राहणाऱ्यांनी पाहणी केली असता कुटुंबातील चौघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.