पारनेर :- वारंवार पैशाची मागणी करणार्या आपल्या प्रेयसीचा खुन करुन पसार झालेल्या प्रियकराला मुंबईहुन अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश मिळाले आहे.
पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे काल ता.28 रोजी सायंकाळी ही घटना घडली. मात्र गुन्हा दाखल होताच पारनेर पोलिसांनी आरोपी गोविंद सुरेश ढवण रा .कोहकडी ता. पारनेर यास अवघ्या बारा तासात जेरबंद केले.
याबाबत माहीती अशी, कोहकडी ता. पारनेर येथील संध्या गव्हाणे या विवाहीत महीलेचे गावातीलच गोविंद उर्फ पप्पु सुरेश ढवण याच्याशी अनैतिक संबध होते. मात्र वारंवार पैशाची मागणी होत असल्याने या प्रियकराने आपल्या प्रेयसीचा काटा काढला.
ही प्रेयसी राहत्या घराजवळ पाण्याचा हंडा भरुन येत असताना आरोपीने चाकुने सपासप वार केले. हातावर,बरगडीवर चाकुचे वार झाल्यानंतर ही गंभीर जखमी होवुन जागीच ठार झाली.
प्रेयसी जागीच ठार झाल्याचे पाहुन या प्रियकराने धुम ठोकली. मयत पत्नीचा पती सुभाष गव्हाणे यांच्या फिर्यादीवरुन पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच
पारनेर पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवुन अवघ्या बारा तासात आरोपी गोविंद उर्फ पप्पु सुरेश ढवण यास मुंबईच्या गोवंडी परीसरातुन ताब्यात घेतले या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असुन त्याला गजाआड केले आहे.