अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-कोरोनामुळे सध्या सर्वच क्षेत्रे बंद आहेत. याला शिक्षण विभागही अपवाद नाही.
परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आदेश शासनाने काढला व विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी या मार्गाने प्रयत्न सुरु झाले.
परंतु आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे.
ऑनलाइन शाळा या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला किंवा नाही, हेही शिक्षकांना तपासता येणार आहे आणि बऱ्याच गोष्टी सुकर होणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याची दखल घेतली आहे.
पवार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क करुन याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
डिजिटल स्कूल क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संदीप गुंड यांनी आमदार निलेश लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमात सहभाग नोंदविल्याने ऑनलाइन शाळेच्या पारनेर पॅटर्नकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
डिजिटल शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुंड यांना तिन वेळा राष्ट्रपतींकडून गौरविण्यात आले असून असा गौरव होणारे गुंड हे देशातील एकमेव प्राथमिक शिक्षक आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com