पारनेरचे जावई झाले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा,) व पारनेर तालुक्याचे जावई आणि सध्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले सुनील गव्हाणे यांची निवड झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील गव्हाणे यांनी पक्षासाठी दिवसरात्र काम केले. या कामाची दाखल घेत त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे हे राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी यांचे बंधू शांतीलाल मापारी यांचे जावई आहेत. यामुळे पारनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

राष्ट्रवादी युवकच्या कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बीडच्या महिबुब शेख यांच्या सारख्या सामान्य कुटुंबातील युवकाला राष्ट्रवादीने संधी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने हाच पायंडा विद्यार्थी संघटनेच्या निवडीमध्येही कायम ठेवला आहे.

पक्षाच्या वाढीसाठी विद्यार्थी आणि युवक या दोन आघाड्या महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन्ही आघाड्यांमध्ये तळागळातील व राजकीय वारसा नसलेल्या नवख्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण राष्ट्रवादीने घेतले आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील असून ते मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

प्रदेशाध्यक्ष गव्हाणे यांच्या निवडीबद्दल आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर तालुका परिवाराच्यावतीने अभिनंदन व पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24