‘या’ कारणामुळे झाला पारनेरच्या त्या तरुणाचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- मुंबईवरून पारनेर तालुक्यातील दरोडी मध्ये आलेल्या ३२ वर्षीय तरुणाचे रविवारी सायंकाळी नगर येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले होते त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचे त्याच्या मृत्युनंतर त्याची कोरोना चाचणी स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आले होते.

या अहवालानंतरच तो तरुण ‘सारी’ आजाराने मृत्यु झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली, या रूग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या घाटकोपर येथून हा तरुण, त्याची पत्नी, भाऊ व भावजय तीन दिवसांपूर्वी दरोडी येथे आले. स्थानिक समितीने चौघांनाही संस्थात्मक क्वारंटाइन करून जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवले होते.

दोघा भावांपैकी धाकट्यास रविवारी सायंकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यात आला. पारनेर येथे आणल्यानंतर प्राथमिक तपासणी करण्यात आली.

लक्षणे आढळल्याने तत्काळ नगर येथे हलवण्यात आले. उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. घशातील स्त्रावाचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले. मृतदेह शासकीय रुग्णालयातच ठेवण्यात आला असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर तो नातेवाईकांकडे द्यायचा निर्णय घेण्यात येणार होता.

अहवाल निगेटिव्ह आल्याने चिंतेचे कारण राहिले नाही. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही मात्र त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली असून तिचा अहवाल सोमवारी रात्री उशिरा मिळाला असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पारनेर मध्ये मुंबईतून आलेल्या एकाच मृत्यू झाला होता. त्यानंतर दरोडी येथे या तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी धडकताच गावातील लोकांमध्ये खळबळ माजली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24