अहमदनगर :- महिलेचे मोबाईलवर अश्लिल चित्रीकरण केल्याचा प्रकार पाथर्डीत घडला आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून देविदास मोरे याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
गुन्हा दाखल होताच, या तरुणाने शहरातून पोबारा केला आहे. या प्रकाराचा सर्वच थरातून निषेध होत आहे.
पीडित महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, “मोबाईलमधील कॅमेरा चालू करून, तो लपवून ठेवून चित्रीकरण केले जात होते.
बारकाईने पाहिल्यावर मोबाईल लपवून ठेवल्याचे लक्षात आले. या मोबाईलचा कॅमेरा चालूच होता. त्याद्वारे चित्रीकरण होत होते. मोबाईल ताब्यात घेत सुरू असलेले चित्रीकरण बंद केले.
मोबाईलमध्ये चित्रित झालेला व्हिडिओ पाहिल्यावर त्यात चित्रीकरण झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मोबाईल बंद करून घरी नेला.
मोबाईल घेण्यासाठी आरोपी घरी आला. माझा मोबाईल आणला आहे का, अशी विचारणा त्याने केली. तेव्हा चित्रीकरण करण्यासाठी ठेवलेल्या आरोपीचा मोबाईल असल्याचे लक्षात आले.
चित्रीकरणाबाबत विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. घटनेबाबत कुणालाही सांगू नको. तुझे आणखी व्हिडिओ काढले आहेत. सर्वांना दाखवीन, अशी आरोपीने पीडित महिलेला धमकी दिली.
या सर्व प्रकाराची माहिती पीडित महिलेने नातेवाईकांना दिली. या सर्व प्रकाराचा जाब मोरे याला विचारला असता, त्याने नातेवाईकांनाही शिवीगाळ केली.
माझ्याकडे पूर्वी काढलेले फोटो आहेत, ते दुसऱ्याला दाखवीन, अशी धमकी मोरे याने दिली.तसे फिर्यादीत देखील म्हटले आहे.