पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.