मोदी, पवार, फडणवीस यांच्या होणार सभा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : मतदारसंघात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्टार नेत्यांच्या सभा होणार अाहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन असून सावेडीतील संत निरंकारी भवनाशेजारील मोकळ्या जागेत ही सभा होण्याची शक्यता आहे.

पोलिस प्रशासाने पंधरा दिवसांपूर्वीच या मैदानाची पाहणी केली आहे. ही जागा उपलब्ध झाली नाही, तर वाणीनगर येथील मैदानावर सभा घेण्यात येईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभा होणार आहेत. 

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत. पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा होतील. 

शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांचीही सभा होणार आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे नाव असले, तरी ते या मतदारसंघात प्रचार करणार नाहीत. काँग्रेसचे नेत आमदार बाळासाहेब थोरात सभांना उपस्थित राहतील. 

दरम्यान, मोदी यांची एक, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा या मतदारसंघात होणार असून मोदी यांच्या सभेची तारीख अजून निश्चित झालेली नाही.

या सभेबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांची पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्याबरोबर चर्चा झाली. केडगाव येथील मैदानाची देखील पोलिस प्रशासनाने शुक्रवारी पाहणी केली. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24