लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्याला पिकअपने चिरडले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथे घोगरगाव रोडवर रणनवरे वस्तीजवळ लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्याला पिकअपने चिरडल्याची घटना काल रात्री घडली.

यात तो व्यक्ती जागीच ठार झाला. सुनिल मधुकर पाळंदे (रा. आंबी, ता. श्रीरामपूर) असे मयताचे नाव आहे. पाळंदे हे येथे एका लग्नासाठी येथे आलेले होते. सायंकाळी ते घोगरगाव रस्त्याने चालले असता रात्री साडेनऊ वाजता टाकळीभानहून घोगरगावला जाणाऱ्या पिकअपने त्यांना चिरडले.

यात ते जागीच ठार झाले. वस्तीवरील लोकांनी ही घटना लक्षात आल्यावर घटनास्थळी धाव घेतली. पिकअपचा चालक पळून गेला. त्यांना प्रवरानगर येथे दवाखान्यात नेण्यात आले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पिकअप घोगरगाव येथील असल्याचे समजते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24