अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : वीजपंपांची चोरी करणाऱ्या टोळीचा पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादावादीमुळे भांडाफोड झाला. शेतकऱ्यांनी एकाला रंगेहात पकडले असून पाच चोरट्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेकटे, भुतेटाकळी, कोरडगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी वीजपंप चोरीला गेले आहेत.
यामध्ये शेकटे येथील विष्णू घुले, भास्कर साबळे, जिजाबा घुले, भुतेटाकळी येथील रामहरी केदार, विठ्ठल केदार, दिलीप फुंदे, प्रल्हाद फुंदे, बाबासाहेब दहिफळे, नामदेव पवार, एकनाथ फुंदे यांचा समावेश आहे. चोरांच्या टोळीत पैशांच्या वाटणीवरून वाद झाला.
शेतकऱ्यांनी एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विष्णू घुले यांनी फिर्याद दाखल करताच पोलिसांनी रामनाथ बाबुराव घुले, रामकिसन हरिभाऊ घुले, शरद कालिदास घुले, मारुती साहेबराव घुले (शेकटे) व सयाजी महादेव केदार (निपाणी जळगाव) यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. सयाजी केदार याला शेतकऱ्यांनी पकडून दिले.
Web Title – Plagiarism caused by controversy over the distribution of stolen money!