नगर : शासनाच्या धोरणानुसार प्लास्टिक बंदी कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर संबंधितांवर कारवाई होत आहे.
शासन निर्णयाच्या अनुषंगाने ५० मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या वस्तू असूनही त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे आपण संबंधित पथकाला खातरजमा करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच दंडात्मक रकमेबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले आहे.
प्लास्टिक उत्पादनांवर निर्बंध आणण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप त्यांनी दिले आहे.
त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, बेकरी व्यापारी नकुल चंदे, मतीन शेख, विनोद कराचीवाला, सुधीर परदेशी, नारायण परमार, सुभाष खंडेलवाल, दीपक घिया, सुनील धोकरिया, किरण राका, संतोष बोरा, रोहित लोढा, अभय लुणिया, सत्यजित खटोड, नीलेश मेहरवाल आदी उपस्थित होते.