अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोना कालावधीत ठप्प झालेली प्लास्टिक बंदीची कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या पथकाने आले नगर शहरात चितळे रोड, नवी पेठ भागात आठ ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे.
यामुळे पुन्हा एकदा प्लास्टिकला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले आहे. नगर शहरात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा बडगा महानगरपालिका प्रशासनाने उगारला आहे.
सोमवारी शहरात काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करत तब्बल चाळीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, ऋषिकेश भालेराव, भरतसिंग सारवान, राजेश तावरे, रणजितसिंग सारवान,
ऋषीकेश वाल्मिक आदींनी ही कारवाई केली. दिवसभरात दहा किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. पुढील कालावधीतही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved