अहमदनगर ब्रेकिंग : एकाच कुटुंबातील बारा जणांना अन्नातून विषबाधा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर :- तालुक्यातील देहरे येथील भिल्ल वस्तीमधील माळी कुटुंबातील दहा ते बारा जणांना अन्नातून विषबाधा झाली. विषबाधा झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत.

देहरे गावात भिल्ल वस्ती आहे. त्या वस्तीवर माळी नावाचे कुटुंब राहते. जुनी व नवी बाजरी एकत्र केल्याने हा विषबाधेचा प्रकार घडला आहे, असे प्राथमिक तपासात सांगण्यात आले.

एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याचे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

आरोग्य केंद्रामधून रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर ती दोन तासांनी आरोग्य केंद्रात पोहोचली, अशी तक्रार गावकऱ्यांनी केली. यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी उशीर झाला. अकरा रुग्णाची प्रकृती व्यवस्थित आहे. एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

रुग्णांत ललिता अतुल वाघ (३०), राहुल समेश माळी (२५), सुनीता राहुल माळी (२२), मोनाली रमेश माळी (१५), जनाबाई शंकर माळी (७०), सूरज रोहिदास पवार (२० ), पूजा भास्कर वाघ (१५ , ऊजा भास्कर वाघ (१४), कार्तिक सूरज पवार (५), सुदर्शन अरुण वाघ (३) अशी नावे आहेत.

जुनी आणि नवीन बाजरी एकत्रित दळून त्या पिठाच्या भाकरी खाल्ल्याने विषबाधा झाली, असे काही लोक सांगतात तर मासे खाल्ल्याने विषबाधा झाल्याची चर्चा आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24