अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- बाभळेश्वर चौकातील यमुना लॉजिंग मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग येथे मालक प्रवीण बाळासाहेब पानसंबळ हा महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
त्याप्रमाणे डीवायएसपी संदिप मिटके यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना हॉटेल यमुना लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे.
याप्रकरणी आरोपी क्रं,1) प्रवीण बाळासाहेब पानसंबळ (रा निर्मळ पिंपरी ता. राहता) 2) अरबाज मोहमद शेख (रा. बाभळेश्वर) यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे.
आरोपी विरुध्द लोणी पोलीस स्टेशन जि..अहमदनगर येथे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.