शहरातील या भागातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोना, लॉकडाऊनच्या काळात शहरात बंद असलेले अवैध धंदे आता खुलेआमपणे सुरु झालेले आहे.

दरम्यान अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. शहरातील मल्हार चौकाशेजारील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 85 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या आदेशानुसार उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे.

मल्हार चौकातील गाडीलकर वीटभट्टी शेजारी बांबूच्या झोपडीच्या आडोशाला पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल व जुगार खेळण्याचे साहित्य असे एकूण 1 लाख 85 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यात पोलिसांनी प्रशांत चंद्रकांत पवार, धनेश दिलीप चव्हाण, गोरख रमेश गायकवाड, सुरेश शिवदास ननवरे, लखन विठ्ठल कुसळकर, अनिल वसंत फुलसौंदर व दोन अज्ञात ईसम यांचे विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24