दारू अड्ड्यावर पोलिसांचे छापे,देशी विदेशी दारू जप्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा येथील हॉटेल जय मल्हार येथे ५ हजार २२० रूपयांची देशी विदेशी दारू पो. कॉ. सत्यजित शिंदे यांनी टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आली.

या गुन्हयाप्रकरणी विठठल बाळू माकर तसेच सुनिल बबन मगर (दोघेही रा. ढोकसांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. दोघाही आरोपींविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. एस. जी. रोकडे हे पुढील तपास करीत आहेत. वडझिरे येथे घराच्या आडोशाला गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून

पो. कॉ. सत्यजित शिंदे यांनी १ हजार ५०० रूपयांची १५ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. याप्रकरणी बजरंग अमृता दिघे (वय ६५, रा. वडझिरे) या आजोबांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24