घरात विनापरवाना ठेवण्यात आलेला स्फोटकांचा साठा पोलिसांनी जप्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील एक घरात विनापरवाना ठेवण्यात आलेला ११ लाख ९० हजार रुपये किमतीच्या स्फोटकांचा (फटाके) साठा पोलिसांनी जप्त केला.

विशेष पोलिस पथकाने ही कारवाई केली. प्रभारी पोलिस अधीक्षक डाॅ. दत्ताराम राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हा छापा टाकला.

विशेष पोलिस पथकाने अरणगाव शिवारात पंचसमक्ष बापू एकनाथ आमले यांच्या घरावर छापा टाकला. स्फोटके खरेदी करणारे दत्तात्रय गोरक्षनाथ वाबळे यांना बोलावून त्यांच्यासमोर घराची तपासणी केली.

१०९ खोक्यांमध्ये १०.९० लाखांची स्फोटके मिळाली. या प्रकरणी नगर तालुका ठाण्यात कलम २८६ सह भारतीय स्फोटके पदार्थ (द्रव्ये) अधिनियम १८८४ चे कलम ९ (ब) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पोलिस पथकाचे उपनिरीक्षक एस. एच. सूर्यवंशी यांच्या पथकातील कर्मचारी व नगर तालुका ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24