फरार बाळाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याबाहेर पोलीस पथके रवाना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे.

स्टॅडिंग वॉरंट जारी झाल्यानंतरही रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार बाळ बोठे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान आता या कुरापती बाळाच्या अडचणीत भर पडली आहे.

त्याचा सुगावा लागल्यानंतर नगर पोलिसांनी जिल्ह्याबाहेर तीन ठिकाणी छापेमारी केली. पण तेथेही तो सापडला नाही. दीड महिन्यानंतरही बोठेच्या अटकेसाठी पोलिसांची छापेमारी सुरूच आहे.

दरम्यान, शुक्रवारी सुद्धा पथक वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान जिल्हा न्यायालयाने बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

त्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्याविरोधात न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट काढले आहे. पारनेर न्यायालयातून स्टँडिंग वॉरंट मंजूर झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.

अहमदनगर लाईव्ह 24