….आणि निलेश लंकेंनी दिला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशास नकार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेर मध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात शिवसेनेतून बडतर्फ झालेले निलेश लंके हे आपल्या हजारो कार्यकर्त्यासह अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.

परंतु अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने निलेश लंके यांनी ऐन सभेच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली. यामुळे सभा तासभर उशिरा सुरू झाली.

दरम्यान विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांनी तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे करून दिले.

मधुकर उचाळे यांनी निलेश लंके यांची मनधरणी केल्यानंतर लंके यांनी पारनेर येथे निर्धार परिवर्तन यात्रेच्या मेळाव्यात आपल्या हजारो कार्यकर्त्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अहमदनगर लाईव्ह 24