अहमदनगर :- सोधा राजकारणासाठी समाजाचा विसर पडलेल्या आमदारांनी पक्षनिष्ठा वेशीवर टांगली आहे. आम्हाला झोपडपट्टीवासीयांचा पक्ष म्हणून हिणवणाऱ्या आमदारांचीच आम्हाला किव येते, अशी टीका शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता केली.
सातपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ‘सोधा राजकारणासाठी आमदारांनी पक्षनिष्ठा वेशीवर टांगली आहे. आम्ही समाजातील शेवटच्या घटकापासून ते उच्चभ्रुपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन चालतो.