श्रीगोंदा :- शरद पवार हे फक्त हुल देतात. मी त्यांच्या पक्षासाठी एवढा त्याग करूनही त्यांनी मला व माझ्या कुटुबीयांना खूप त्रास दिला आहे. असल्याची टीका माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी केली.
काष्टी येथे युतीच्या प्रचारमेळाव्यात ते बोलत होते. नगर दक्षिणमध्ये जगताप नावाचे तीन आमदार आहेत. मात्र, अरूणकाकांनी सभागृहात कधी तोंड देखील उघडले नाही.
तर, इतर दोघांनी पाच ते सहा मिनिटे भाषणे केली असतील. यावरून यांना जनतेचे प्रश्न आणि ते सोडविण्याची तळमळ दिसून येते.’अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.