अहमदनगर :- भाजप सरकार शेतकऱ्यांचे असून सत्तेचा वापर जनतेसाठी करण्यात येतो. कुकडीचे आवर्तन हे पोलिसांच्या संरक्षणात सोडण्यात येणार आहे.
दक्षिण नगरमध्ये सुजय विखे यांची सुनामी लाट आली आहे.’ या वेळी पार्थ पवार यांच्या भाषणाची नक्कल करून राम शिंदे म्हणाले की,
‘जर साधे भाषण करणेही जमत नसेल तर ते आधी शिकून घ्यावे, जमत नसेलतर त्यात पडू नये. मात्र, पवार कुटुबांतील अतंर्गत वादामुळे पार्थ पवार निवडणुकीत उतरले आहेत.
त्यांचा पराभव होणार हे सर्वेक्षणात दिसून आले आहे. शरद पवार म्हणाले की १९९१ ची पुनरावृत्ती होणार आहे. मात्र, त्यांना सांगावे वाटते की पवारांचा मटका आता लागणार नाही, हे निश्चित आहे.’
काष्टी येथे युतीच्या प्रचारमेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे अध्यक्षस्थानी होते.
या वेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, विक्रम पाचपुते, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र म्हस्के, तुकाराम दरेकर, दत्ता पानसरे, बाळसाहेब नहाटा, मिलिंद दरेकर, प्रतिभा पाचपुते, सदाशिव पाचपुते, संतोष लगड, गणपतराव काकडे, बाळासाहेब हिरणवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.