या तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. निवडणुकीचा प्रचार अखेरीस संपला व शेवटी आज मतदानाचा दिवस उजाडला आहे.

राहुरी तालुक्यात होणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींतील ३६० जागांच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आज मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले.

या ४४ ग्रामपंचायत निवडणुकीत ५६ जागा बिनविरोध झाल्याने ३६० जागांसाठी ८०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी १६० मतदान केंद्राची व्यवस्था आहे.

निवडणूक यंत्रणा हाताळण्यासाठी १६० केंद्रात १६० महिला अधिकारी, ३२० मतदान अधिकारी, १६० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले.

४१८ पैकी ५६ जागा बिनविरोध आल्या आहेत. राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या ३६० जागांसाठी होणारा निवडणुकीचा प्रचार बुधवारी सायंकाळी थंडावला आहे.

राहुरी खुर्द, वांबोरी, उंबरे या भागातील दोन्ही गटांच्या सांगता सभा शांततेत झाल्या. निवडणूक यंत्रणा सज्ज असून बंदोबस्त ठेवण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24