वाळू तस्करांच्या दोन गटात जोरदार राडा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :  म्हैसगाव-कोळेवाडी भागात वाळूच्या व्यवहारावरून वाळू तस्करांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. एकमेकांवर गावठी पिस्तुले रोखल्याने एकाच दहशद निर्माण झाली.

या घटनेतील तुळशीराम काशीनाथ केदार (रा. चिखलठाण, ता. राहुरी) यास राहुरी पोलिसांनी अटक केली. रवींद्र उर्फ पप्पू अप्पासाहेब शिंदे (रा. खांबे, ता. संगमनेर) हा पसार झाला आहे.

राहुरी पोलिसांनी याबाबत शस्त्र बाळगल्याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई केली नाही. सध्या मुळा आणि प्रवरा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने वाळू तस्करांनी पुन्हा बेकायदा वाळू उपसा सुरू केला आहे.

म्हैसगाव, शेरी चिखलठाण भागातही जोरदारपणे खुलेआम वाळू तस्करीला उधाण आले आहे. यातूनच  रविवारी म्हैसगाव-कोळेवाडी रस्त्यावर वाळू तस्करांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. प्रकरण गावठी पिस्तुलापर्यंत गेले. वाळू विक्रीच्या व्यवहारावरून ही घटना घडली.

अहमदनगर लाईव्ह 24