पाथर्डी : मी जरी आमदार झालो असलो तरी माझं वय तरुणांच्या बरोबरीच आहे,त्यामुळे कार्यकत्यांर्सह हितचिंतकांनी मला साहेब न म्हणता बंधुत्वाच्या नात्याने दादाच म्हणावे, असे आवाहन राहुरी- नगर- पाथर्डीचे नवनिर्वाचित आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पाथर्डी तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला ज़ाईल, असेही आ. तनपुरे या वेळी म्हणाले. आ. तनपुरे यांनी पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या असता, करंजी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
करंजी येथे आ. तनपुरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी जि. प. चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सभापती संभाजीराव पालवे, शिवसेनानेते रफिक शेख, राष्ट्रवादीचे नेते धीरज पानसंबळ, बाबासाहेब निमसे, युवानेते प्रकाश शेलार, उध्दव दुसंग, राजेंद्र पाठक, रूपचंद अकोलकर, आबासाहेब अकोलकर, सुभाष दानवे,
बाबासाहेब शेत्रे, भानुदास अकोलकर, भाऊसाहेब मोरे, नवनाथ देवकर, अशोक दानवे, गजानन गायकवाड, गणेश अकोलकर, जालिंदर वामन, बाबा मोरे, राजेंद्र मरकड, रमेश अकोलकर, मच्छद्रिं अकोलकर, आकाश क्षेत्रे, पंकज भाकरे, शफीक पठाण, बापू आरोळे, विश्वास क्षेत्रे, फकिरा क्षेत्रे, किशोर अकोलकर, अजय पाठक, सलमान पठाण ,
नामदेव दुतारे,आर्ष लगड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आ. तनपुरे पुढे म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी लवकरच प्रादेशिक नळयोजनेच्या संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाणार आहे.
तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचे तत्काळ टेंडर काढून या हे काम सुरू केले जाईल. मतदानातून तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड विकास कामांतून करीन, अशी ग्वाही आ. तनपुरे यांनी यावेळी दिली.