अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- युवानेते प्रशांत गडाख हे खरेतर देशपातळीवर सामाजिक नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेतृत्व अाहे. भविष्यात देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास त्यांनी ती दवडू नये, असे सूचक वक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
पुणे येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आयोजित ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी डॉ. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते झाले.
खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पत्रकार मधुकर भावे, संदीप वासलेकर, शशिकला शिंदे, साहित्यिक मिलिंद जोशी यावेळी उपस्थित होते.
मंत्री थोरात म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा राजकीय, सामाजिक व साहित्यिक वारसा युवानेते प्रशांत पाटील गडाख सक्षमपणे चालवत आहेत.
प्रशांत पाटील गडाख म्हणाले, माजी खासदार व साहित्यिक असलेले माझे वडील यशवंतराव गडाख यांनी दिलेल्या पहिल्या पुस्तकामुळे लागलेल्या वाचनाच्या आवडीने मी अनेक पुस्तके वाचत गेलो, त्यातूनच भरून गेलो आणि घडतही गेलो.
यावेळी खासदार पाटील, डॉ. मालशेकर, भावे, वासलेकर, जोशी यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी माजी खासदार यशवंतराव गडाख, शारदा गडाख, भारतीय विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, अभिनेते व निर्माते नागराज मंजुळे,
कवी रामदास फुटाणे, साहित्यिक अरुण शेवते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे यांनी मानले.