प्रवरा नदी बनली गटार गंगा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर : संगमनेर येथील प्रवरा नदी ही अक्षरश: गटार गंगा बनली आहे. नदी पात्रातील सांडपाणी हे आजूबाजुच्या शेतकऱ्यांच्या विहीरींना उतरत असल्याने त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर यावर नगरपालिकेने कायमस्वरुपी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणावर वास येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संगमनेर : संगमनेर येथील प्रवरा नदी ही अक्षरश: गटार गंगा बनली आहे.

नदी पात्रातील सांडपाणी हे आजूबाजुच्या शेतकऱ्यांच्या विहीरींना उतरत असल्याने त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर यावर नगरपालिकेने कायमस्वरुपी उपाय योजना करणे गरजेचे आहे.या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणावर वास येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संगमनेर शहरा जवळूनच प्रवरा नदी वाहत आहे. या प्रवरा नदीपात्रात व कडेला अनेक शेतकऱ्यांच्या विहीरी आहे. त्याचबरोबर काही विहीरींमधून गावांना पाणी पुरवठाही केला जात आहे.

पण सध्या प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी दिसत असून त्यामुळे या सांडपाण्याचा वासही सुटला आहे. तसेच याठिकाणी असलेल्या पुलावरुन ये जा करताना अनेकांना नाकाला रुमाल लावून चालावे लागत आहे. कारण पाण्याच्या वासामुळे नागरिकांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

विहीरींनाही हे पाणी उतरत असल्याने विहिरीतील पाणी दुषित होवून त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना हे पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर दुषित पाण्यामुळे नागरिकांना पोटाचे व इतर आजार होत असल्याने नागरिकही वैतागले आहेत.

या सांडपाण्या संदर्भात यापूर्वीही अनेक वेळा नागरिक व महिलांनी मोर्चे काढत तक्रारी केल्या होत्या. तसेच नगरपालिका प्रशासनाला दुषित पाण्याचे पुरावेही दिले होते.

त्यावेळी याबाबत लवकरात लवकर उपाय योजना करण्यात येणार आहे, असे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही.

नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्याने नदीपात्रातील विहिरी व कडेला असणाऱ्या विहिरींचे पाणी दुषित होत आहे. वास्तविक पाहता या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र याबाबत नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे.

त्यामुळे प्रवरा नदी पात्र हे सांडपाण्यामुळे काळे कुट्ट दिसत आहे. आता नगरपालिका या सांडपाण्या संदर्भात काही उपाय योजना करणार आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24