दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव द्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : शासनाने दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव द्यावा अथवा १० रुपये लिटरप्रमाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कोपरगावच्या नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांच्याकडे सोमवारी एका निवेदनाद्वारे केली.

मागील तीन महिन्यापूर्वी दुधाला ३४ रुपये प्रती लिटर भाव होता. सद्यस्थितीत कोरोनामळे तो २० रुपये इतका कमी झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे.

त्यामुळे शासनाने दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव द्यावा, अथवा १० रुपये लिटर प्रमाणे अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे, असे म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24