श्रीगोंदे : श्रीगोंदे साखर कारखाना परिसरातील मारुती मंदिरासमोरील खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी दुपारी छापा टाकत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले.
जुगाराचे साहित्य व रोख ५ हजार ५३० रुपये पोलिसांनी जप्त केले. कॉन्स्टेबल संतोष कोपनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
काहीजण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने छापा टाकून नितीन अल्लु ईदरगी, अक्षय संजय बाबर, रवी रामभाऊ ससाणे, अनिल सुभाष ठोकळे, रामदास राजू भोसले, पांडुरंग सुभाष दळवी, कुमार जंबू गिरे, महादेव दादासाहेब कुरूमकर (सर्व श्रीगोंदे कारखाना परिसर) यांना पकडण्यात आले.