रस्त्यासाठी ‘या’ गावातील ग्रामस्थांनी रक्तदान करून केले आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
श्रीगोंदा : देवदैठण व पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो.
अनेकांना मणक्याच्या त्रासाने तसेच पाठीच्या दुखण्याने बेजार केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे.

यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग केव्हा येणार ? की अजुन जीव घेणार असा प्रश्न सर्वं सामान्य नागरिकांना पडला आहे. रस्ता व्हावा यासाठी ३० जणांनी रक्तदान आंदोलन करून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले.

भाजपचे लोकप्रतिनिधी असताना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हे अनोखे रक्तदान आंदोलन करून घरचा आहेर दिला आहे. अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा करून देखील आश्वासनाशिवाय दुसरे काहीच मिळाले नाही.

यामुळे आता देवदैठण ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतरही प्रशासन जागे झाले नाही तर दि.२० पासून रास्ता रोको व आमरण उपोषण करून आंदोलन तीव्र केले जाणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24