अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- प्रवरा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करताना २०१६ साली दाखल झालेल्या खटल्याचा नुकताच निकाल आला. यामध्ये आरोपी बाळासाहेब केरुजी शिंदे (रा. गळनिंब, ता. श्रीरामपूर) यास न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार दंड ठोठावण्यात आला आहे.
लोणी पोलिस स्टेशनचे तत्कालीन सपोनि रणजित गलांडे व पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व भय्यासाहेब देशमुख यांच्या कार्यकाळात प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करताना गळनिंब येथील आरोपी बाळासाहेब शिंदे यास लोणी पोलिस पथकाने अटक केली. यामध्ये लाल रंगाचा ट्रक व दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
पोलिस नाईक एस. आर. लांडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. या घटनेचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी या गुन्ह्याचे श्रीरामपूर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. क्राईम रायटर दहिफळे यांनी या गुन्ह्यात तपासकामी मदत केली. याप्रकरणी लोणी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. नुकताच या गुन्ह्याचा निकाल श्रीरामपूर न्यायालयाचे न्यायाधीश बी. जी. पवार यांनी दिला. यामध्ये आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व २५ रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा सुनावली आहे.
सुनावणी दरम्यान सहायक सरकारी अभियोक्ता सी. आर. साळवी यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस नाईक के. बी. पंडित यांनी काम पाहिले. या गुन्ह्यामध्ये आरोपीस शिक्षा झाल्याने भविष्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नक्कीच चाप बसेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved