अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील तलाठी श्रीकांत भाकड यांनी अनधिकृत उत्खनन करून दगड वाहतूक करणारे 2 डंपर व एक ट्रॅक्टर पकडून शनीशिंगनापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वडाळा बहिरोबा येथील एका ठिकाणी अनधिकृत उत्खनन करून दगड वहातुक होत असल्याची माहिती तलाठी श्रीकांत भाकड यांना मिळाली.
त्यांनी तात्काळ कोतवाल अशोक वाघमारे यांना सोबत घेऊन त्याठिकाणी जाऊन 2 डंपर व एक ट्रॅक्टर ताब्यात घेतले. याची माहिती नेवासा तहसीलदार, मंडलाधिकारी व पोलिसांना दिली.
शनी शिंगणापूर पोलिसांनी सदर डंपर व ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. यातील ट्रॅक्टरला 1 लाख 8 हजार रुपये तर डंपरला प्रत्येकी 3 लाख 24 हजार रुपये प्रमाणे 6 लाख 48 हजार रुपये 2 डंपरला एकूण 7 लाख 56 हजार रुपये दंड थोटविण्यात आला आहे.