अहमदनगर लाईव्ह24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील भगवानगडावरील वास्तुसंग्रहालयातून भगवानबाबा यांनी वापरलेली २ बोअरची एक रायफल व तलवार चोरीला गेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
गडावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित आरोपी दिसत असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही रायफल संत भगवानबाबा स्वतः वापरत होते.
वस्तू वस्तुसंग्रहालयात एकूण दोन रायफली होत्या. चोरटे त्या दोन्हीही रायफल घेऊन गेले. त्यातील एक रायफल अन्नछत्रालयासमोरील हनुमान मंदिरासमोर टाकून दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकास पाचारण केले.
मात्र श्वानाने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत माग काढला. गडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री गडावरच आहेत. गडावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com